Pu La Deshpande : भाई, बटाट्याच्या चाळीचे मालक; पु.ल. देशपांडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी आहे. मराठी साहित्यातील एक अजरामर बहुगुणी व्यक्तिमत्व अर्थात पु. ल देशपांडे म्हणजे सगळ्यांचे लाडके भाई हे प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार, आणि गायक होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी साहित्य क्षेत्र ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं नाव म्हणजे पु.ल. देशपांडे.
पु.ल. देशपांडे उर्फ भाई हजरजबाबीपणामुळेदेखील ओळखले जायचे. त्यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते.
पु.ल. देशपांडे यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहे.
दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत पु.ल. देशपांडे यांनी घेतली होती.
पु.ल. देशपांडे यांना पद्यमश्री आणि पद्मभूषण अशा दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
धोंडो भिकाजी कडमडे जोशी, मंगेश साखरदांडे, बटाट्याच्या चाळीचे मालक, भाई, कोट्याधीश पु.ल, पुरुषराज अळूरपांडे ही पुलंची टोपणनावे आहेत.
पु.ल. देशपांडे यांनी अनेक लेखसंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, एकपात्री प्रयोग, एकांकिका, नाटकं, विनोदी कथा लिहिल्या आहेत.