सेनापती बाबर बाद होताच पाकिस्तानची शरणागती, 36 धावांत 8 जण तंबूत
पाकिस्तानची धावसंख्या 155 असताना बाबर आझम बाद झाला. त्यानंतर पुढील 36 धावांत पाकिस्तानचे 8 फलंदाज तंबूत परतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सेनापती बाबर आझम तंबूत परतल्यानंतर इतर सैनिकांनी भारताच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्कारली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 42.4 षटकात 191 धावांपर्यंत मजल मारु शकला.
पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. त्याशिवाय मोहम्मद रिजवान याने 49 धावांचे योगदान दिले. भारताकडून बुमराह, सिराज, हार्दिक अन् कुलदीप यांनी भेदक मारा केला. भारताला विजयासाठी 192 धावांचे आव्हान आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना अश्वासक सुरुवात केली. अब्दुलाह शफीक आणि इमाम यांनी भारतीय गोलंदाजाची छातीठोक सामना केला. 41 धावांची भागिदारी झाल्यानंतर सिराजने अब्दुलाह शफीक याला तंबूत धाडले. शफीक याला 20 धावांची खेळी करता आली. त्याने आपल्या या खेळीत 3 चौकार लगावले. त्यानंतर बाबर आझम आणि इमाम यांनी डाव सावरम्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने इमामला तंबूचा रस्ता दाखवला. हार्दिक पांड्याने चेंडू टाकण्याआधी चेंडूवर काहीतरी केल्याचे दिसले.. हा फोटो व्हायरल होतोय. त्याने मंत्र फुकल्याचे अनेकजण म्हणत आहे. इमाम 36 धावांवर बाद झाला. यामध्ये त्याने सहा चौकार ठोकले.
बाबर आझम आणि इमाम यांनी डाव सावरम्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने इमामला तंबूचा रस्ता दाखवला. हार्दिक पांड्याने चेंडू टाकण्याआधी चेंडूवर काहीतरी केल्याचे दिसले.. हा फोटो व्हायरल होतोय. त्याने मंत्र फुकल्याचे अनेकजण म्हणत आहे. इमाम 36 धावांवर बाद झाला. यामध्ये त्याने सहा चौकार ठोकले.
इमाम बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि अनुभवी मोहम्मद रिझवान यांनी डावाची सुत्रे संभाळली. दोघांनी एकेरी दुहेरी धावसंख्या करत पाकिस्तानची धावसंख्या वाढवली. दोघांनाही भारतीय आक्रमणाचा खंबीरपणे सामना केला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली, पाकिस्तानची धावसंख्याही 150 पार गेली. ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवणार, असेच वाटत होते. त्याचवेळी रोहित शर्माने सिराजला बोलवले. मोहम्मद सिराजने कर्णधाराला निराश केले नाही. सिराजने अर्धशतक ठोकणाऱ्या बाबरला तंबूत पाठवले. सिरजाच्या चेंडूवर बाबर आझम त्रिफाळाचीत बाद झाला. बाबरने 58 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 50 धावा जोडल्या. बाबरची विकेट पडल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
सेनापती बाबर आझम माघारी परतल्यानंतर सर्व जबाबदारी रिझवानच्या खांद्यावर होती. पण पाकिस्तानच्या इतर फलंदाजांनी साथ दिली नाही. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. सौद शकील आणि इफ्तिखार यांनी एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. त्यानंतर मोहम्मद रिझवान याला बुमराहने त्रिफाळाचीत केले.
उप कर्णधार शादाब खान यालाही मोठी खेळी करता आली नाही. शादाब खाना दोन धावा काढून बुमराहचा शिकार झाला. 3 बाद 155 ते 7 बाद 171 अशी दयनीय अवस्था झाली. अवघ्या 16 धावांत पाकिस्तान संघाने पाच विकेट गमवल्या. मोहम्मद रिझवान अनलकी ठरला. रिझवान 49 धावांवर तंबूत परतला.
मोहम्मद रिझवान याने 69 चेंडूमध्ये सात चौकारांच्या मदतीने 49 धावांची खेळी केली. बाबर आझम बाद झाल्यानंतर रिझवानची बॅटही शांत झाली. बाबर बाद झाल्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. सौद शकील 6 धावा काढून बाद झाला. इफ्तिखार चाचा याला कुलदीपचा चेंडू समजलाच नाही, तो चार धावांवर बाद झाला.
शादाब खान याला बुमराहने दोन धावांवर त्रिफाळाचीत बाद केले. मोहम्मद नवाज याला हार्दिक पांड्याने चार धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. तर हसन अली याला 12 धावांवर जाडेजाने शुभमन गिलकरी झेलबाद केले. एकवेळ 300 धावांची शक्यता वाटत असतानाच पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पाकिस्तानचा संपूर्ण डाव 191 धावांत आटोपला.