Ind vs NZ : तुमचा एजाज तर आमचा अश्विन अन् सिराज! न्यूझीलंडचा 62 धावांत धुव्वा; टीम इंडियाकडे मोठी आघाडी

India vs New Zealand 2nd Test : एजाज पटेलनं संपूर्ण भारतीय संघाला बाद करत विश्वविक्रम रचला. मात्र, न्यूझीलंडला हा आनंद फार काळ साजरा करता आला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एजाज पटेलच्या फिरकी माऱ्यापुढे भारतीय संघ ढेपाळत होता. एजाजने एकाच डावात 10 विकेट घेत विश्वविक्रम केला.

सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांनी भारतीय संघाचा डाव सावरला.
मयांकने 150 धावांची खेळी केली तर अक्षर पटेल याने अर्धशतकी खेळी केली. एजाज पटेलने दर्जेदार आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत संपूर्ण भारतीय संघाला बाद केलं
भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान मालिकेतील अखेरचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सुरु आहे. एजाज पटेलच्या विश्वविक्रमाच्या बळावर न्यूझीलंड संघानं भारताला 325 धावांवर रोखलं
भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंड संघाला अवघ्या 62 धावांत गुंडाळलं. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणारा न्यूझीलंडचा संघ अतिशय दुबळा दिसत होता.
263 धावांची आघाडी असतानाही भारतीय संघानं फॉलोअन देण्याचा निर्णय घेतला नाही. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आहे.
325 धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. सिराजने आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडचं कंबरडं मोडलं. तर अश्विनने चार फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडची अवस्था अधिकच बिकट केली. अक्षर पटेलने दोन तर जयंत यादव यांने एक बळी घेतला. न्यूझीलंडकडून एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फंलदाजी करता आली नाही.