In Pics : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची मालिकेत 1-0 ची आघाडी
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिका भारताने जिंकली पण एकदिवसीय मालिकेची सुरुवात भारताची पराभवाने झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिला एकदिवसीय सामना ऑकलंडमध्ये पार पडला, ज्यामध्ये न्यूझीलंडने 7 गडी राखून विजय मिळवला.
या दमदार विजयामुळं मालिकेतही न्यूझीलंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत 307 धावांचं आव्हान केवळ 47.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केलं.
आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने केला. ज्यानंतर भारताने सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर 306 धावां केल्या.
ज्या न्यूझीलंडने टॉम लेथमच्या नाबाद 145 आणि कर्णधार केनच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर पूर्ण करत सामना जिंकला.
भारताकडून कर्णधार शिखरनं 72 तर शुभमननं 50 धावा करत एक चांगली सुरुवात केली.
पण दोघेही बाद झाल्यावर सूर्या आणि पंत स्वस्तात बाद झाले. संजूने 36 तर सुंदरने 37 धावांचं योगदान दिलं. पण श्रेयसच्या 80 धावांमुळे भारत 300 पार जाऊ शकला.
पण गोलंदाजीत भारताने खराब कामगिरी केली. सर्वच गोलंदाजांना न्यूझीलंडच्या लेथम आणि केन जोडीनं धुतलं.
आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता होणार आहे.