Shraddha Walker Murder Case: आरोपीने लेकीचे 35 तुकडे केले, बाप शेवटपर्यंत लढत राहिला; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?
Shraddha Walker Murder Case: मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरातील त्यांच्या राहत्या घरी विकास वालकर निधन झाले.
Shraddha Walker Murder Case
1/9
श्रद्धा वालकर (Shraddha Walker Murder Case) हिचे वडील विकास वालकर (Vikas Walkar) यांचे निधन झाले आहे.
2/9
मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरातील त्यांच्या राहत्या घरी विकास वालकर निधन झाले.
3/9
विकास वालकर यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. मात्र विकास वालकर बऱ्याच काळापासून नैराश्यात होते. विकास वालकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नाही.
4/9
2022 मध्ये दिल्लीत श्रद्धा वालकरची हत्या झाली होती. तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने तिची हत्या केली होती. दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबर 2022मध्ये आफताबला अटक केली. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे.
5/9
आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे जवळपास 35 तुकडे करून तिचे मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकले होते.
6/9
सदर प्रकरणी पोलिसांनी त्याची कसून तपासणी केली असता त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याचंही उघड झालं होतं.
7/9
विशेष म्हणजे सहा महिन्यानंतर श्रद्धाचे वडील विकास यांनी मुलगी हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
8/9
अडीच महिन्यापासून आपल्या मुलीचा काहीच संपर्क होत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
9/9
आज विकास वालकर यांचा अचानक मृत्यू झाल्याने श्रद्धा वालकरच्या आरोपीला फाशी कधी मिळणार, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
Published at : 09 Feb 2025 02:34 PM (IST)