Ind vs Ban: बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर WTC च्या फायनलचं नवीन समीकरण; टीम इंडियाची एन्ट्री जवळपास निश्चित
भारत आणि बांगलादेशमधील (India vs Bangladesh) दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाने कसोटीत व्यत्यय आणल्याने सामना ड्रॉ होईल, अशी शक्यता होती.
सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही षटक न होता दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. मात्र चौथ्या दिवशी कसोटी सामन्यात टी-20 सारखी फलंदाजी करत टीम इंडियाने विजय जवळपास निश्चित केला.
बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने जिंकली.
बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर WTC च्या गुणतालिकेत बदल झाला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी देखील टीम इंडिया WTC च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती. आता पहिलं स्थान आणखी भक्कम केलं आहे.
बांगलादेशविरुद्धच्या या विजयानंतर WTC च्या फायनलमधील स्थान टीम इंडियाने जवळपास निश्चित केलं आहे.
WTC च्या गुणतालिकेत सध्या टीम इंडिया 74.24% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचे 55.56% गुण झाले आहेत. तर इंग्लंडचा संघ 42.19% गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.