Gandhi Jayanti 2024: महात्मा गांधींचा गुजरात ते 'राष्ट्रपिता' प्रवास कसा घडला? त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या सर्वकाही..
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन आजही संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहे. ज्यांनी कधीच शस्त्र उचलले नाही, पण ज्यांचे शब्द ब्रिटिश सरकारसाठी खंजीराचे काम करत होते. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींनी गुजरात ते लंडन आणि नंतर आफ्रिकेतून राष्ट्रपिता कसा प्रवास केला? जाणून घ्या..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजन्म: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, भारत येथे झाला. त्यांचे वडील एक सक्षम प्रशासक होते आणि आई धार्मिक विचारांच्या होत्या
शिक्षण: गांधींनी 1888 मध्ये लंडनमध्ये कायद्याचा अभ्यास केला, जिथे ते अनेक प्रमुख लोकांना भेटले आणि विविध धर्मांचा अभ्यास केला.
दक्षिण आफ्रिका: 1893 मध्ये, गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले, जिथे त्यांनी भारतीयांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला आणि सत्याग्रहाचा सिद्धांत विकसित केला.
स्वराज्य चळवळ: 1919 मध्ये गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते बनले आणि त्यांनी स्वराज्याची मागणी केली.
सविनय कायदेभंग: 1920 मध्ये, गांधींनी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी आणि स्वदेशी कापड वापरण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली.
मिठाचा सत्याग्रह: 1930 मध्ये त्यांनी मिठाच्या कायद्याच्या विरोधात 240 मैलांचा मोर्चा काढला, ज्यामुळे हजारो लोकांना अटक झाली आणि चळवळ प्रसिद्ध झाली.
स्वातंत्र्यासाठी संघर्ष: 1947 मध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले, परंतु फाळणीमुळे गांधी नाराज राहिले.
हिंसेला विरोध : फाळणीच्या काळात जातीय दंगली थांबवण्यासाठी गांधींनी उपोषण केले आणि अहिंसेच्या तत्त्वावर भर दिला.
महात्मा गांधी भारतीय राजकारणातील एक दंतकथा झाले असताना 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे नथुराम गोडसे या माथेफिरुने त्यांची गोळ्या घालून हत्या केली. नंतरच्या काळात बिर्ला भवन येथेच त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले. आज हा परिसर गांधी स्मृती स्थळ म्हणून ओळखला जातो
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )