IND vs BAN : आम्ही कोणत्याही टीमला पराभूत करु शकतो, बांगलादेशच्या कॅप्टनची भारताविरूद्धच्या मॅचपूर्वी डरकाळी

भारत आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील मोहीम सुरु करतील. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाकडे विजयाचा दावेदार म्हणून पाहिलं जातंय. दुसरीकडे बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसैन यानं देखील भारताला इशारा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बांगलादेशचा कॅप्टन म्हणाला आमच्या टीमला कमी लेखण्याचा प्रयत्न करणं टीम इंडियासाठी महागात पडेल. चॅम्पियन्स ट्रॉफीत कोणताही संघ कमजोर नाही. आमच्या टीमच्या नियोजनानुसार सर्व गोष्टी घडल्या तर ते कोणत्याही संघाला पराभूत करु शकतात असं हुसैन म्हणाला.

विजयानं सुरुवात करणं दरवेळी तुम्हाला गती मिळवून देतं. आम्ही दरवेळी विजयाचं लक्ष्य ठेवून चांगली सुरुवात करण्यावर भर देणार आहे. आम्हाला सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळणं आवश्यक आहे. एकदिवसीय सामन्यासाठी बांगलादेशचा संघ संतुलित असून आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो, असं नजमुल हुसैन म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफी विजयासाठी सर्व संघ सक्षम आहेत, असंही तो म्हणाला.
बांगलादेशचा कॅप्टन पुढं म्हणाला की तो विरोधी टीम बाबत फार विचार करत नाही. आमचा प्लॅन योग्य पद्धतीनं लागू झाल्यास आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो. बांगलादेशची गोलंदाजी चांगली होईल, अशी त्याला अपेक्षा आहे. आमच्याकडे नाहिद राणा, तस्किन यांच्यासारखे वेगवान गोलंदाज आहेत, असंही तो म्हणाला.
बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसैन पुढं म्हणाला नाहिद राणानं गेल्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. आम्ही अशा गोलंदाजीनं विरोधी संघाला आव्हान देऊ शकतो, असं नजमुल हुसैन म्हणाला.