Virat Kohli : का आहे विराट चॅम्पियन प्लेअर? कोच राहुलनं कोहलीची मुलाखत घेत केला खास गोष्टींचा उलगडा
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 1205 दिवसानंतर विराटने कसोटीत शतक ठोकल्यावर सर्व स्तरातून त्याचं कौतुक होऊ लागलं.
अशात भारतीय संघाचा कोच राहुल द्रविड यानेही विराटची मुलाखत सामन्यानंतर घेतली. या मुलाखतीत राहुलने काही हटके प्रश्न विचारले तर विराटनंही हटके उत्तर दिली.
विराटला मोठ्या खेळी खेळण्याची सवय असल्याचं राहुलने म्हटल्यावर विराट म्हणाला, मी जेव्हा 40 धावा करतो त्यानंतर मला माहित असतं मी 150 धावांपर्यंत जाऊ शकतो. ज्याने माझ्या संघाला फायदा होऊ शकतो.
तसंच माझा डिफेन्स माझी ताकद असल्याचंही विराट म्हणाला.
तर विराटचं कौतुक करताना राहुल द्रविड म्हणाला की, हा असा खेळाडू आहे जो कधीही षटकार ठोकू शकतो. पण तरी संघाची गरज ओळखून तो खेळी करतो. हीच गोष्ट त्याला एक चॅम्पियन बनवते असं राहुल म्हणाला....
विशेष म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीत जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कोहलीने कसोटी शतक ठोकलं आहे.
याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीने बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं.
त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटने केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्याने ठोकलेला नाही. दरम्यान 2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली होती, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान केली होती.
पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.