बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान; जाणून घ्या त्यांच्या हिट चित्रपटांबद्दल

आमिर खानचा (Aamir Khan) आज 58 वा वाढदिवस आहे. आमिरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात त्याच्या करिअरबाबत...

aamir khan

1/10
'मिस्टर परफेक्शनिस्ट' अशी ओळख असणारा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतो.
2/10
आज आमिरचा 58 वा वाढदिवस आहे. आमिरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.
3/10
आमिरचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबईमध्ये झाला. आमिरने 1973 मध्ये 'यादों की बारात' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं.
4/10
आमिरने अभिनयक्षेत्रात काम करावं, असं त्याच्या वडिलांना वाटत नव्हतं. पण आमिरने अवन्तर नावाच्या थिएटर ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
5/10
'कयामत से कयामत तक' या चित्रपटात त्याने पहिल्यांदा हिरोची भूमिका साकारली.
6/10
आमिरला बालपणी टेनिस खेळायला खूप आवडत होते. त्याला टेनिस प्लेअर व्हायचे होते. तो शाळेत असताना टेनिस चांगला खेळायचा. त्याने शाळेत असताना राज्यस्तरीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता.
7/10
'कयामत से कयामत तक' या चित्रपटातील आमिरच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटाचं बजेट कमी होतं.
8/10
आमिरने स्वत:च या चित्रपटाचे पोस्टर रिक्षा आणि बसच्या मागे लावण्याचे काम केले. काही दिवसांपूर्वी आमिरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आमिर हा रिक्षाच्या मागे चित्रपटाचे पोस्टर लावताना दिसत होता.
9/10
आमिर हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. मन, इश्क, गुलाम, फना, तारे जमीन पर या चित्रपटांमध्ये आमिरने काम केलं.
10/10
आमिरच्या लगान, दंगल, पीके आणि थ्री इडियट्स या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
Sponsored Links by Taboola