IND vs AUS: टीम इंडियाचे योद्धे, हातात बॅट नाही, जणू तलवार घेऊनच मैदानात येतात, गोलंदाजांवर तुटून पडतात
IND vs AUS World Cup 2023 Final: विश्वचषकाच्या महायुद्धातल्या निर्णायक लढाईसाठी आज अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालंय. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमधल्या सलामीच्या लढाईनं विश्वचषकाच्या मोहिमेला पाच ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममधून सुरुवात झाली होती. आणि आता विश्वचषक मोहिमेच्या सांगतेला भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा अहमदाबादच्या रणांगणात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारतानं आजवर 1983 आणि 2011 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. तसंच ऑस्ट्रेलियानं 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली विश्वचषकाचा मान मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्मानं एकही गोलंदाजाला अभय दिलं नाही. जो मला बॉल टाकणार त्याला मी झोडणार, अशाच आवेशात रोहित शर्मा मैदानात उतरतो आणि भल्याभल्या गोलंदाजांना फटकावतो. रोहित शर्मानं 10 डावांत 550 धावांची धमाकेदार खेळी 101.57 च्या सरासरीनं खेळली आहे.
टीम इंडियाचं रनमशिन म्हणजे, विराट कोहली. विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. 20 वर्षांपासून हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.
यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीनं आठव्यांदा 50 धावसंख्या ओलांडत सचिन तेंडुलकरचा 2003 विश्वचषकातील रेकॉर्ड मोडलाय. सचिन तेंडुलकरनं 2003 च्या विश्वचषकात 674 धावा केल्या होत्या. 20 वर्षांनंतरही हा विक्रम विराट कोहलीनं मोडला आहे. विराट कोहलीनं 101.57 च्या सरासरीनं 10 डावांत 711 धावांची खेळी खेळली आहे.
श्रेयस अय्यरने विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने चालू विश्वचषकात 2 शतकांच्या मदतीने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीला खराब कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. यावरही आता अय्यरनं सडेतोड उत्तर दिले आहे. श्रेयसनं विश्वचषक 2023 मध्ये 10 डावांत 75.14 च्या सरासरीनं 526 धावा केल्या आहेत.
विश्वचषकाच्या रणांगणात केएल राहुलच्या बॅटमधून निघणारे फटके, विकेटमागे झेपावत घेणारा झेल... असो अथवा डीएआरएससाठी रोहितला करत असलेली मदत... राहुल एक नंबरी कामगिरी करतोय. दुखापतीनंतर परतलेल्या राहुलने विकेटच्या मागे 100 टक्के योगदान दिलंय. केएल राहुलनं 77.20 च्या सरासरीनं 9 डावांत 386 धावा केल्या आहेत.
शुभमन गिल सध्या टीम इंडियाच्या सलामीचा कणा बनला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शुभमन गिलने ICC रँकिंगमध्ये मोठी झेप घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. पण हाच शुभमन गिली प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या तोंडचं पाणीही पळवतो. शुभमन गिलनं विश्वचषक 2023 मध्ये 49.42 च्या सरासरीनं 08 डावांत 346 धावा केल्या आहेत.