In Pics : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून मोठा विजय, मालिकेतही साधली 1-1 ची बरोबरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणमच्या मैदानात पार पडलेल्या दुसऱ्या एकदिवसीय भारतीय संघ तब्बल 10 विकेट्सने पराभूत झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी भारतीय संघाची फलंदाजी फारच खराब झाली. भारतीय संघ अवघ्या 117 धावांत सर्वबाद झाला.
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 तर अक्षर पटेलनं नाबाद 29 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कनं 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी कमाल अशी शतकी भागिदारी करत संघाला हा दणदणीत विजय मिळवून दिला आहे. हेडनं नाबाद 51 तर मार्शनं नाबाद 66 धावा केल्या आहेत.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वस्तात सर्वबाद करुन निर्धारीत लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचा ऑस्ट्रेलियाचा डाव होता.
त्यानुसारच त्यांनी सुरुवातापासून भेदक गोलंदाजी केली. त्यांचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कनं अप्रतिम गोलंदाजी करत महत्त्वाच्या 5 विकेट्स घेतल्या.
ज्यामुळे भारतीय संघ केवळ 117 धावाच करु शकला. भारतीय सलामीवीर शुभमन गिल शून्यावर बाद झाल्यावर विराट-रोहित जोडी कमाल करेल असं वाटत होतं. पण रोहितही 13 धावांवर बाद झाला. मग सूर्या आजही शून्यावर तंबूत परतला. विराट आज एक चांगली धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. पण त्यालाही कोणाची सोबत मिळत नव्हती. अखेर तो 31 धावा करुन बाद झाला. तसंच केएल 9 , पांड्या 1 जाडेजा 16, कुलदीप यादव 4 तर शमी-सिराज शून्यावर बाद झाले. अक्षरनं अखेरपर्यंत नाबाद 29 धावांची झुंज दिली. पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने भारताचा डाव 117 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 5 तर सिन अबॉटने 3 आणि नॅतन एलिसने 2 विकेट्स घेतल्या.
118 धावांचे सोपो लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आज अगदी टी20 सारखा खेळ करत केवळ 11 षटकांत संघाला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी कमाल अशी शतकी भागिदारी करत संघाला 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला आहे. यावेळी ट्रेव्हिस हेड यानं नाबाद 51 तर मार्शनं नाबाद 66 धावा केल्या. भारताचा एकही गोलंदाज विकेट घेऊ न शकल्याने भारताला हा मोठा पराभव पत्करावा लागला.
या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. त्यामुळे भारतानं आजचा सामना जिंकला असता तर मालिकाविजयाची संधी भारताकडे होती. पण भारत अवघ्या 117 धावांत सर्वबाद झाल्यामुळे आता भारत हा सामना गमावेल असे वाटत होते आणि तसेच झाले. आता दोन्ही संघ मालिकेत 1-1 अशा बरोबरीत असून तिसरा सामना निर्णायक असणार आहे.