IPL Records : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार कोणाच्या बॅटमधून?, यादीत गब्बर अव्वलस्थानी
आयपीएल म्हणजे चौकार आणि षटकारांचा पाऊस आणि स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक चौकार भारतीय क्रिकेटचा गब्बर शिखर धवनने लगावले आहेत. त्याने 654 चौकार लगावले असून 5 हजार 784 रन त्याच्या नावावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधवन नंतर सर्वाधिक चौकार किंग कोहलीच्या नावे आहेत. त्याने 546 चौकार लगावले असून आयपीएलमध्ये 6 हजार 283 रन केले आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर असून त्याने 525 चौकार लगावत 5 हजार 449 रन केले आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने 506 चौकार आयपीएलमध्ये लगावले आहेत. त्याच्या नावावर 5 हजार 528 रनही आहेत.
रोहित शर्माने आयपीएलमध्ये 491 चौकार लगावले असून 5 हजार 611 रन त्याने केले आहेत.
आयपीएलमधून निवृत्त झालेला गौतम गंभीर याने 154 सामन्यात 4 हजार 217 रन केले असून यात 491 चौकार त्याने लगावले आहेत.
रॉबीन उथप्पा यानेही 462 चौकार लगावत 4 हजार 722 रन आयपीएलमध्ये आतापर्यंत केले आहेत.
या यादीत शेवटचं नाव असणारा खेळाडू म्हणजे अजिंक्य रहाणे. त्याने 417 चौकार लगावत 3 हजार 941 रन केले आहेत.