ICC WTC Final : कमबॅक असावा तर अजिंक्य रहाणेसारखा! टेस्ट स्कॉडमधून बाहेर गेल्यावरही दमदार कामगिरीच्या जोरावर थेट WTC Final च्या संघात एन्ट्री!
इंग्लंडमध्ये (England) होणाऱ्या जागतिक कसोटी विजेतेपद अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी (ICC World Test Championship) भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारताचा 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
महत्वाचं म्हणजे आयपीएलमध्ये तुफान फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने भारताच्या कसोटी संघात (Team India Test Cricket Team) पुनरागमन केलं आहे.
जवळपास सव्वा वर्षानंतर अजिंक्य रहाणेनं कमबॅक केलं आहे. रहाणे शेवटची कसोटी जानेवारी 2022 मध्ये खेळला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.
7 ते 11 जून दरम्यान जागतिक कसोटी स्पर्धा खेळवली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन (Australia Cricket Team) संघाला 28 मे पर्यंत संघांची संख्या 17 वरून 15 करावी लागेल. त्यानंतर ॲशेस मालिका (Ashes Test) आहे. दरम्यान, शेवटच्या तीन कसोटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.