ICC T-20 World Cup 2024: रोहित शर्मापासून विराट कोहली, हार्दिक पांड्यापर्यंत; टी-20 विश्वचषकाच्या जर्सीत दिसले भारतीय खेळाडू
टी20 विश्वचषकाला चार आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. भारतीय संघाकडून विश्वचषकाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App6 मे रोजी भारतीय संघाची विश्वचषकासाठीची जर्सी लाँच करण्यात आली आहे. धर्मशालामध्ये टीम इंडियाची जर्सी लाँच करण्यात आली.
जर्सी लाँच केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी नवीन जर्सी परिधान करुन फोटो काढले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही संघाची नवीन जर्सी परिधान केल्याचा फोटो समोर आला आहे.
विराट कोहलीपासून अनेक भारतीय खेळाडू टी-20 विश्वचषक 2024 च्या जर्सीत दिसले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जर्सी लाँच करण्यापूर्वी बीसीसीआयने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड केली होती.
1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहे. भारतीय संघाचा अ गटात समावेश आहे.
विश्वचषक 2024 चा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. यानंतर भारतीय संघाचा दुसरा सामना रविवारी, 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.