Met Gala 2024: मेट गालामध्ये आलिया भट्टला पाहून चाहते घायाळ, तुम्हीही फोटो पाहाचं!
आलिया भट्टने मेट गालाच्या रेड कार्पेटवर शानदार पुनरागमन केले आहे. 2024 मध्ये, अभिनेत्री दुस-यांदा गालाची शोभा वाढवत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीने मेट गाला 2024 च्या रेड कार्पेटवरील एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
हत्यांच्या नजरा आलियाच्या सौंदर्यावर आणि स्टाईलवर खिळल्या आहेत.
दुसऱ्यांदा आलिया भट्टने मेट गाला 2024 मध्ये अतिशय सुंदर शैलीत भारताचे प्रतिनिधित्व केले.
या खास प्रसंगी आलियाने फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली साडी नेसली.
मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलिया भट्टने लाइट ऑलिव्ह रंगाची फ्लोरल साडी कॅरी केली होती.
या साडीमध्ये कलरफुल हॅण्ड एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे. अभिनेत्रीने सब्यसाचीच्या सिग्नेचर ज्वेलरीसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
आलिया भट्टचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
प्रत्येकजण तिच्या लूकचे खूप कौतुक करत आहे. काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या फोटोंवर 60 हजारांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.(फोटो : /aliaabhatt/ig)