Hardik Pandya : धमाकेदार कामगिरीनंतरही ICC ची हार्दिक पांड्यावर कारवाई; नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या धारदार गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या हार्दिक पांड्याला नवीन आयसीसी रँकिंगमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या मेगा स्पर्धेत भारतासाठी पंड्याने फिनिशर फलंदाजाची भूमिका बजावली.

पण, यानंतरही या स्टार अष्टपैलू खेळाडूला आयसीसीच्या नवीन एकदिवसीय रँकिंगमध्ये कोणताही फायदा झाला नाही.
हार्दिक पंड्याला आयसीसीच्या नवीन एकदिवसीय अष्टपैलू रँकिंगमध्ये एक स्थान खाली घसरला आहे.
हार्दिक पांड्या सध्या आयसीसीच्या नवीन क्रमवारीत 181 गुणांसह 22 व्या क्रमांकावर आहे.
यापूर्वी तो 21 व्या स्थानावर होता.
पण, हार्दिक व्यतिरिक्त गेल्या आठवड्यात इतर खेळाडूंनीही अष्टपैलू खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली.
यामुळे पंड्याला एक स्थान गमवावे लागले आहे.
त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाची पण एक स्थानांनी घसरण झाली आहे.
जडेजा 220 गुणांसह नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर गेला आहे.