आफ्रिदीने रचला इतिहास, 51 सामन्यात विकेट्सचं शतक, स्टार्कला टाकले मागे
पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App23 वर्षीय आफ्रिदीने फक्त 51 सामन्यात 100 विकेट घेऊन विक्रम केला आहे.
विश्वचषकात बांगलादेशविरोधात शाहीन आफ्रिदीने 100 विकेटचा टप्पा पार केला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 विकेट्स घेण्याचा स्टार्कचा विक्रम आफ्रिदीने मोडलाय. स्टार्कने 52 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या होत्या.
वनडेत सर्वात वेगवान 100 विकेट्स घेण्याचा विक्रम नेपाळच्या संदीप लामिछाने याच्या नावावर आहे. त्याने 42 सामन्यात हा पराक्रम केला होता. त्यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी राशिद खान असून त्याने 44 सामन्यात ही कामगिरी केली होती. तसेच, चौथ्या स्थानावरील मिचेल स्टार्कने 52 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या आहेत.
बांगलादेशविरोधात आफ्रिदीने आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानचा संघ लयीत नसला तरी आफ्रिदी तुफान फॉर्मात आहे.
यंदाच्या विश्वचषकात शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत 16 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो संयुक्त पहिल्या क्रमांकावर आहे.