Gautam Gambhir Salary : विराट-रोहितपेक्षा गौतम गंभीरला पगार जास्त, BCCIने दिले वर्षाला इतक्या कोटींचे पॅकेज
बीसीसीआयने जुलै महिन्यात माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल 2024 मध्ये विजेतेपद मिळवून दिले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपला तेव्हा बोर्डाने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गंभीरकडे सोपवली.
फार कमी लोकांना माहित असेल की बीसीसीआय गंभीरला वार्षिक पगार म्हणून 12 कोटी रुपये देत आहे. होय, वर्षाला 12 कोटी रुपयांच्या पगारानुसार दरमहा एक कोटी रुपये मिळत आहेत. पगाराव्यतिरिक्त त्यांना इतर अनेक मार्गांनी पैसे मिळत आहेत.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, बीसीसीआय गौतम गंभीरला केवळ 12 कोटी रुपये पगार देत नाही, तर त्याशिवाय इतर अनेक सुविधाही दिल्या जात आहेत. परदेश दौऱ्यांवर गंभीरला दररोज 21 हजार रुपये भत्ता मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पगार आणि भत्त्यांव्यतिरिक्त गौतम गंभीरला आणखी 2 सुविधा मिळत आहेत. यातील एक बिझनेस क्लासमधील तिकीट आणि दुसरे पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची संपूर्ण व्यवस्था आहे.
आता 2024 मध्ये कोचिंगची जबाबदारी स्वीकारणारा गंभीर 2027 पर्यंत या पदावर राहणार आहे. या कालावधीत आयसीसीच्या 4 स्पर्धा खेळल्या जातील.