Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध एका डावात केल्या 823 धावा; सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा संघ कोणता?
Highest Innings Total In Test: हॅरी ब्रूकचे त्रिशतक आणि ज्यो रूटच्या द्विशतकी खेळीमुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 27 वर्षांत एका डावात 800 हून अधिक धावा करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. पाकिस्तानच्या 556 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 7 बाद 823 धावांवर डाव घोषित केला. (Photo Credit-Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App267 धावांनी माघारलेल्या पाकने दुसऱ्या डावात 152 धावांत सहा फलंदाज गमावताच इंग्लंडचा विजय दृष्टिपथात आला. शुक्रवारी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी चार फलंदाज बाद करावे लागतील. पाकिस्तान अद्याप 115 धावांनी मागे आहे.(Photo Credit-Social Media)
पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने 823/7 धावांवर डाव घोषित केला. कसोटी इतिहासातील एका डावातील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली.(Photo Credit-Social Media)
कसोटी इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने भारताविरुद्ध ही धावसंख्या केली होती. ऑगस्ट 1997 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताविरुद्ध 952/6d धावा केल्या होत्या.(Photo Credit-Social Media)
या यादीत इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट 1938 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने 903/7d धावा ठोकल्या होत्या.(Photo Credit-Social Media)
यादीत तिसऱ्या स्थानावर देखील इंग्लंडचा संघ आहे. एप्रिल 1930 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इंग्लिश संघाने 849 धावा केल्या होत्या.(Photo Credit-Social Media)
यानंतर इंग्लंडही चौथ्या क्रमांकावरही आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने 823/7d धावा केल्या.(Photo Credit-Social Media)
वेस्ट इंडिज या यादीत पाचव्या स्थानावर आहे. फेब्रुवारी 1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने 790/3d धावा केल्या होत्या.(Photo Credit-Social Media)