Wisden Cricketer of Year : हरमनप्रीत कौरचा 'जगात गाजावाजा'! विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळवणारी पहिला महिला खेळाडू
भारतीय महिला क्रिकेटपटू आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौरला विशेष सन्मान देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरमनप्रीत कौरला विशेष सन्मान देण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरला विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2022 (Wisden T20I player of 2022) च्या यादीत स्थान मिळालं आहे.
ऐतिहासिक बाब म्हणजे हरमनप्रीत कौर विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2022 सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
हरमनप्रीतने 111 चेंडूत केलेल्या शानदार 143 धावांच्या खेळीमुळे भारताला 1999 पासून इंग्लंडमध्ये पहिली एकदिवसीय मालिका जिंकता आली. यामुळेच तिला या यादीत स्थान देण्यात आलं आहे.
हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) विस्डेनच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंच्या यादीत (Wisden Cricketers of the Year) नाव मिळविणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला.
1889 सालापासून विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर ही यादी प्रकाशित केली जाते.
जगभरातील क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा या यादीत समावेश केला जातो.
या यादीत जगभरातील इतर ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात न्यूझीलंडचे (New Zealand) टॉम ब्लंडेल (Tom Blundell) आणि डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) तसेच इंग्लंडचे England) बेन फोक्स (Ben Foakes) आणि मॅथ्यू पॉट्स (Matthew Potts) या खेळाडूंनाही मान मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियाची (Australia) फलंदाज बेथ मुनी (Beth Mooney) हिला तीन वर्षात दुसऱ्यांदा जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (World's Top Women's Cricketer) म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे.