Hemangi Kavi : हेमांगी कवीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष; म्हणाली...

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हेमांगीनं (Hemangi Kavi) तिचे बालपण आणि तिचे आई-बाबा याबाबत सांगितलं.

(Hemangi Kavi/instagram)

1/8
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.
2/8
हेमांगीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
3/8
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हेमांगीनं तिचे बालपण आणि तिचे आई-बाबा या विषयांवर चर्चा केली.
4/8
हेमांगीनं एका पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणाबद्दल सांगितलं.
5/8
'तुझ्यात हा फिअरलेस अप्रोच कसा आला?' असा प्रश्न हेमांगीला पॉडकास्टमध्ये विचारण्यात आला.
6/8
प्रश्नाचं उत्तर देत हेमांगी म्हणाली, 'बोल्ड, निर्भीड, बिनधास्त असं मला कोणी म्हटलं की, मला आश्चर्य वाटतं. मी जे बोलते त्या गोष्टी बोलायलाच पाहिजेत. मी निर्भीड असण्यामागील कारण म्हणजे माझे बाबा. माझ्या बाबांनी माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये Gender Difference कधीच केला नाही.'
7/8
पुढे हेमांगी म्हणाली, 'टायटॅनिक, दयावान यांसारखे सिनेमे आम्ही एकत्र बसून बघितले आहेत. माझी आई सातवी पास, माझे बाबा एलएलबी होते. वन रुम किचनमध्ये आम्ही राहात होतो. आई आणि बाबांची प्रायव्हसी आम्ही पाहिलेली आहे. एकदा माझ्या ताईला मी प्रश्न विचारला की, आई-बाबा काय करत होते? तेव्हा ताईनं माझ्यासोबत त्या विषयांवर चर्चा केली होती.'
8/8
हेमांगी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Sponsored Links by Taboola