गौतम गंभीरने रोहित शर्माचा उत्ताराधिकारी निवडला! बुमराह नाही तर... 23 वर्षीय स्फोटक सलामीवीर होणार पुढचा कर्णधार?
अलिकडेच, बीसीसीआयच्या आढावा बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली आणि त्यापैकी एक म्हणजे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधारपदाचे भविष्य.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत भारताचा 3-1 असा पराभव झाल्यापासून रोहितवर बरीच टीका होत आहे. संपूर्ण मालिकेत रोहितला फलंदाजीने काही खास कामगिरी करता आली नाही.
रोहित शर्माने निवडकर्त्यांना सांगितले आहे की, बोर्ड त्याच्या उत्तराधिकारीची नियुक्ती करेपर्यंत तो कर्णधार राहील. यादरम्यान, एका वृत्तानुसार प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहितच्या कर्णधारपदाच्या पर्यायांची निवड केली आहे.
रोहित शर्माचा फॉर्म निवडकर्त्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे, परंतु त्याने निवडकर्त्यांना सांगितले की तो त्याच्या उत्तराधिकाऱ्याला पूर्णपणे पाठिंबा देईल. यानंतर, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार राहील असा निर्णय घेण्यात आला, तर निवड समिती स्पर्धा संपल्यानंतर त्याच्या भविष्याचा निर्णय घेईल.
सोमवारी, एक अहवाल समोर आला ज्यामध्ये असे म्हटले आहे की, आढावा बैठकीत रोहितकडून जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. पण त्यांच्या कामाचा भार व्यवस्थापित करण्यासाठी एका चांगला उपकर्णधाराची गरज देखील चर्चेत आली.
जेव्हा निवडकर्त्यांनी ऋषभ पंतला कसोटी क्रिकेटमध्ये पुढचा कर्णधार बनवण्याचा निर्णयावर विचार केला, तेव्हा गंभीरने यशस्वी जैस्वालला पाठिंबा दिला.
पंत केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व करतो. जून 2022 मध्ये, नियुक्त कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले.