पोलिसांनी फिल्डिंग लावली पण धनंजय देशमुखांचा गनिमी कावा, वेढा चकवून पाण्याच्या टाकीवर पोहोचले
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) पोलिसांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई झाली नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी सरकारला केला आहे.
यावरून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी उंच टाकीवर चढून आंदोलन सुरु केले आहे.
मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.
यामध्ये पाच प्रमुख मागण्यात करण्यात आल्या आहेत. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी.
शासनाचे वकील म्हणून ॲड. उज्वल निकम किंवा ॲड. सतीष मानेशिंदे यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. एसआयटी मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी.
या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहीती घरच्यांना देण्यात यावी. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी करण्यात यावे.
तसेच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु करताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मास्स्जोगमध्ये दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना फोनवर चर्चा करत त्यांना खाली येण्याची विनंती केली आहे. तर यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी आल्याचे दिसून आले.
यावेळी मनोज जरांगे धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर बोलताना म्हणाले की, तुम्हाला काही झाले तर मी यांना सोडणार नाही.
तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे. प्लीज खाली या. तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही प्लीज खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खचून जाऊ नका.
आपल्याला संतोष भैय्याला न्याय द्यायचा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला प्लीज तुम्ही खाली या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.