Ind vs Eng : मॅच जिंकली तरी कोच गौतम गंभीरला रात्री झोप लागेना; टीम इंडियाला लागले मोठे 'ग्रहण'

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला चार विकेट्सने हरवले असेल, पण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या विजयाने फारसे खूश नसतील. कारण सामन्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा भारतीय संघ बॅकफूटवर असल्याचे दिसून आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनेक खेळाडू फेल ठरले. आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळला जाईल, परंतु त्यापूर्वी टीम इंडियाला त्यांच्या अनेक चुका दुरुस्त कराव्या लागतील.

मालिकेत आघाडीवर असूनही गौतम गंभीर टेन्शनमध्ये का आहे याची तीन कारणे जाणून घेईया....
भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूप वाईट फॉर्ममधून जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी कर्णधार फॉर्ममध्ये नसल्याने भारतीय संघ टेन्शनमध्ये असेल. नागपूरमध्ये हिटमनचा डाव अवघ्या सात चेंडूत संपला. तो दोन धावा करून बाद झाला.
गेल्या 16 डावांमध्ये 10.37 च्या खराब सरासरीने फक्त 166 धावा करणाऱ्या रोहितला स्वतःलाच समजत नाही की त्याची बॅट इतक्या दिवसांपासून शांत का आहे?
जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीला दुखापत होणे आश्चर्यकारक आहे. खराब फिटनेसमुळे कोहली शेवटचा सामना कधी खेळला नव्हता हे क्वचितच कोणाला आठवत असेल.
सामन्यापूर्वीही तो गुडघ्याला पट्टी बांधून मैदानावर वॉर्मअप करताना दिसला. कोहलीची दुखापत किती गंभीर आहे हे पाहणे बाकी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी भारतीय संघाला त्यांच्या स्टार फलंदाजाची दुखापत सहन करता येणार नाही.
भारतीय संघाला आधीच त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्येही भारताला या दुखापतीचे परिणाम भोगावे लागले. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्येही पाचव्या कसोटीत दुसऱ्या डावात बुमराह गोलंदाजी करू शकला नाही त्यामुळे भारताला सामना गमवावा लागला.
तेव्हापासून तो संघातून बाहेर आहे. कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, संघ स्कॅन रिपोर्टची वाट पाहत आहे, त्यानंतरच तो चालू मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळेल की नाही हे कळेल.