Guillain Barre Syndrome: जीबीएसमुळे पुण्यात आणखी एकाचा मृत्यू; रुग्णांची संख्या 173 वर, आतापर्यंत 7 जणांनी गमावला जीव
Guillain Barre Syndrome Pune: राज्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 173 वर पोहचली आहे.
GBS Pune
1/8
पुण्यासह राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)ची रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.
2/8
याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीबीएसमुळे पुण्यात पुन्हा एकाचा मृत्यू झाला आहे.
3/8
कर्वेनगरमधील वादरवस्तीत राहणाऱ्या 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
4/8
काशीबाई नवले रुग्णालयात मृत्यू झाला. हा पुण्यातला सहावा बळी असून राज्यातला सातवा मृत्यू आहे.
5/8
रुग्णाला ताप, जुलाब, चालण्याचा त्रास आणि अशक्तपणा जाणवत होता.
6/8
पुण्यातील चार, पिंपरी चिंचवड मधील एक तर सोलापुरातील एक अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
7/8
राज्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 173 वर पोहचली आहे.
8/8
जीबीएस रोग म्हणजे काय?- गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.
Published at : 07 Feb 2025 08:57 AM (IST)