इशान किशनपासून श्रेयस अय्यरपर्यंत...; टीम इंडियाचे खेळाडू लवकरच लग्नबंधनात अडकणार!
भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे लग्न झालेले नाही. परंतु टीम इंडियातील काही खेळाडू लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. (Photo Credit-Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइशान किशन: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन 26 वर्षांचा असून त्याने अद्याप लग्न केलेले नाही. मात्र, इशानचे नाव मॉडेल अदिती हुंडियासोबत जोडले गेले आहे. आदिती हुंडिया इशान किशनची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा आहे.(Photo Credit-Social Media)
श्रेयस अय्यर: टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर 29 वर्षांचा असून त्याने अद्याप लग्न केलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अय्यरच्या अफवा असलेल्या गर्लफ्रेंडचे नाव त्रिशा कुलकर्णी आहे. ती लाइमलाइटपासून खूप लांब राहते.(Photo Credit-Social Media)
ऋषभ पंत : डावखुरा फलंदाज ऋषभ पंतनेही अद्याप लग्न केलेले नाही. पंत सध्या 26 वर्षांचा आहे. पंतचे नाव ईशा नेगीशी जोडले जाते. दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांचे फोटो शेअर केले आहेत.(Photo Credit-Social Media)
कुलदीप यादव : भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव देखील लवकरच लग्न करणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर लग्नाबद्दल बोलत असताना कुलदीप म्हणाला होता की तुम्हांला लवकरच आनंदाची बातमी मिळेल.(Photo Credit-Social Media)
मोहम्मद सिराज : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 30 वर्षांचा आहे. सिराजने एकदा आपली एंगेजमेंट झाल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे मोहम्मद सिराज देखील लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे.(Photo Credit-Social Media)