Rahul Dravid Video: राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या व्हिडीओत राहुल द्रविड एका रिक्षावाल्याशी भांडताना दिसत आहे. एरवी राहुल द्रविड म्हटले की शांत आणि संयमी व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते. मात्र, या व्हिडीओत राहुल द्रविडच्या स्वभावाची दुसरी बाजू पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ बंगळुरूमधील असल्याचे सांगितलं जात आहे. यामधये राहुल द्रविड आणि ऑटो ड्रायव्हरमध्ये हा वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
राहुलच्या गाडीला लोडिंग ऑटोवाल्याने मागील बाजूने धडक दिली. मंगळवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली.
यावेळी राहुल द्रविड इंडियन एक्सप्रेस सर्कलहून हाय ग्राउंडकडे जात होता, तिथे त्याला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या दरम्यान त्याच्या गाडील ऑटोवाल्याने धडक दिली
या अपघातात राहुल द्रविडच्या गाडीचे फारसे नुकसान झालेले नाही. पण त्याच्या गाडीला डेंट आल्याचे तो रिक्षाचालकाला सांगताना दिसत आहे. या दोघांमध्ये कन्नड भाषेत सुरु असलेला हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.