Chhatrapati Sambhaji nagar Crime news: छत्रपती संभाजीनगरमध्ये इन्स्टाग्रामवर भाईगिरीचे रील टाकणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली धिंड

Maharashtra Crime news: इन्स्टाग्रामवर धारदार शास्त्र घेऊन रील काढून दहशत गाजवणं तरुणांना भोवलं. पोलिसांनी काढली शहरभर धिंड, छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी भाईंचा माज उतरवला.

Continues below advertisement

Chhatrapati Sambhaji nagar Crime

Continues below advertisement
1/5
तुम्हीही INSTAGRAM वर चुकीचे व्हिडिओ टाकत असाल तर सावधान. कारण छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरात हुल्लडबाज तरुणांकडून इंस्टाग्रामवरती रिल्स काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या सगळ्यांना पोलिसांनी इंगा दाखवला.
2/5
हातात धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावर रिल्स काढण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ इंस्टाग्रामवर या तरुणाच्या रील पाहून या तरुणांना ताब्यात घेतले.
3/5
इन्स्टावरील अनेक रिल्समध्ये काही तरुण कमरेला कट्टा, हातात कोयता, धारदार शस्त्र घेऊन, कॉलर उडवत रील व्हायरल करत होते.
4/5
पाचोड पोलिसांनी यांना ताब्यात घेतले असून, या तरुणांची पाचोड येथील पाचोड पैठण चौकातून धिंड काढत पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
5/5
इंस्टाग्रामवर भाईगिरी करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी चौकातून धिंड काढत भाईगिरी उतरवली.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola