ITR भरला पण अजूनही मिळाला नाही परतावा? जाणून घ्या कधीपर्यंत पैसे रिफंड होणार?
Income Tax Refund: आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2024 होती. त्यामुळे आता आयटीआर भरण्याची शेवटची मुदत कधीच निघून गेलेली आहे. आता लोकांना करपरताव्याची आस लागली आहे. आयटीआर भरून एक महिना उलटला असला तरी अनेकांना करपरतावा मिळालेला नाही. .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला अद्याप रिफंड पैसे आलेले नसतील तर यामागची कारणे काय असू शकतात. करपरताव्यारुपी पैसे येण्यास आणखी किती वेळ लागू शकतो, हे जाणून घेऊ या...
आयटीआर भरल्यानंतर सर्वांत अगोदर प्राप्तिकर विभाग आयटीआरला अप्रुव्ह करतो. प्राप्तिकर विभागाचे अप्रुव्हल मिळाल्याशिवाय तुम्हाला रिफंड मिळत नाही. या अप्रुव्हलनंतर किती रुपये तुम्हाला रिफंड मिळणार हे समजते.
आयटीआर भरल्यानंतर रिफंडसाठी कमीत कमी वीस दिवस लागतात. एका असेसमेंट इअरच्या रिफंडसाठी प्राप्तिकर विभाग जास्तीत जास्त 9 महिन्यांचा कालवधी घेऊ शकतो.
म्हणजेच जुलै महिन्यात आयटीआर भरला असेल तर तुम्हाला 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिटर्न्स मिळू शकतात.
तुम्ही अद्याप आयटीआर दाखल केला नसेल तर विलंब शुल्कासह तुम्ही आजदेखील आयटीआर भरू शकता. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करू शकता.