Ruturaj Gaikwad Wedding : ऋतुराज गायकवाडचं शुभमंगल सावधान! उत्कर्षा पवारसौबत बांधली लग्नगाठ
यंदाचा आयपीएल हंगाम गाजवणारा चेन्नईचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड यानं उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा महाबळेश्वरमध्ये 3 जून रोजी पार पडला आहे.
त्याचा आयुष्यातील या खास क्षणाचे फोटो ऋतुराजने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांच्यावर आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या विजयानंतर मैदानावर ऋतुराज उत्कर्षा पवारसोबत फिरताना दिसला होता. मध्यंतरी त्या दोघांचा महेंद्रसिंग धोनी सोबतचा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता.
या दरम्यान त्याने लग्नाची घोषणा केली होती. ऋतुराजची बायको उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) ही देखील एक क्रिकेटपटू आहे.
उत्कर्षा आणि ऋतुराज यांची जुनी मैत्री आहे आणि आता या मैत्रीचे रूपांतर जोडीदाराच्या (Ruturaj Gaikwad’s Wife) रुपात झाले आहे.
ऋतुराज गायकवाड 26 वर्षांचा असून उत्कर्षा पवार 24 वर्षांची आहे.
कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या साक्षीने दोघांचा विवाह सोहळा पार पडला.
ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या व्हायरल फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्षष्ट दिसून येत आहे.