In Pics : अबब! 705 धावांच्या फरकाने जिंकला एकदिवसीय सामना, नागपुरात एकाच सामन्यात बनले अनेक रेकॉर्ड
नागपुरात 40 षटकांच्या एका एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड झाल्याचं पाहायला मिळालं,
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडर 14 इंटर स्कूल क्रिकेट स्पर्धेत सरस्वती विद्यालयाने 40 षटकांमध्ये बिनबाद 714 धावा कुटल्या.
ज्यानंतर त्यांनी विरोधी संघ सिद्धेश्वर विद्यालयला 5 षटकांत केवळ 9 धावातच सर्वबाद करत तब्बल 705 धावांच्या फरकाने सामना जिंकला.
यावेळी सरस्वती विद्यालयाचा फलंदाज यश चौडेने 178 चेंडूत नाबाद 508 धावा ठोकल्या.
यशने तब्बल 18 षटकार आणि 81 चौकार लगावले आणि दमदार रेकॉर्ड नावे केले.
नागपुरात सुरु एमआय ज्युनिअर अंडर 14 इंटर स्कूल क्रिकेट स्पर्धेत हा सामना पाहायला मिळाला.
एकही विकेट न गमावता इतकी मोठी धावसंख्या एका संघाने उभारल्यावर याच सामन्यात आणखी एक विक्रम झाला. तो म्हणजे या इतक्या मोठ्या धासंख्येचा पाठलाग करताना विरोधी संघ सिद्धेश्वर विद्यालय 5 षटकांत केवळ 9 धावातच गारद झाला.
सरस्वती विद्यालयाचा गोलंदाज अंकित गेडेकर ने 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सरस्वती विद्यालयाने हा सामना 705 धावांच्या विक्रमी फरकाने जिंकला.
त्यामुळे एकही विकेट न गमावता इतकी मोठी धावसंख्या करणं, इतके चौकार आणि षटकार यासह इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकणं असे अनेक विक्रम यावेळी झाले. दरम्यान शालेय स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मुंबईच्या प्रणव धनावडेच्या नावावर आहे. त्याने 1009 धावा काढल्या होत्या.
दरम्यान पंचशतक ठोकणाऱ्या यशमध्ये प्रचंड गुणवत्ता असून भविष्यात त्याचा खेळ आणखी बहरू शकते आणि तो मोठा क्रिकेटर होऊ शकतो असे मत त्याचे प्रशिक्षक रवी कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.