T20 World Cup 2024 : या 5 दिग्गजांना डावललं, विश्वचषकाच्या संघात असते तर...
टी20 विश्वचषकासाठी अनेक मोठ्या खेळाडूंना डावलण्यात आलेय. या यादीमध्ये पहिलं नाव केएल राहुल याचं येतं. केएल राहुल याचं टी20 करियर शानदार राहिलेय. राहुलने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दोन शतके ठोकली आहेत. आयपीएल 2024 मध्येही राहुलने शानदार कामगिरी केली. पण केएलच्या पदरी निराशाच पडली आहे. त्याची निवड झाली नाही. राहुलने आयपीएलच्या 9 सामन्यात 378 धावा चोपल्या आहेत. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात तो सातव्या क्रमांकावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलमध्ये सलग 5 चेंडूत 5 षटकार मारून रिंकू सिंह चर्चेत आला होता. त्यानंतर रिंकूला टीम इंडियात संधी मिळाली. भारतासाठी, या युवा फलंदाजाने 15 टी-20 सामन्यांमध्ये 176 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 356 धावा केल्या. रिंकू सिंह याला फिनिशर म्हणून स्थान मिळेल, असं वाटलं होतं. पण त्याला टी20 च्या संघात स्थान मिळालं नाही.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिललाही टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकले नाही. गिल याला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास गिल याला 15 जणांमध्ये स्थान मिळेल. गिल यानं भारतासाठी 14 टी20 सामन्यात 147 च्या स्ट्राईक रेटने 335 धावा केल्यात. याशिवाय 100 आयपीएल सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 3094 धावा आहेत.
युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. ईशान किशनला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून डावल्यानं आले होते. आता त्याला संघातून वगळण्यात आलेय.
त्याशिवाय श्रेयस अय्यरला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही. आयपीएल 2024 मध्ये श्रेयस अय्यरची कामगिरी चांगली राहिली आहे. अय्यरने T20 करियरमध्ये शानदार कामगिरी केली आहे. पण त्याला विश्वचषकासाठी संघाबाहेर ठेवण्यात आलेय.