Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI : रोहित ब्रिगेडची कमाल, एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजला पहिल्यांदाच दिला व्हाईट वॉश

अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विंडिजचा 96 धावांनी पराभव केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विडिंजला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले होते.

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट विंडिजचा संघ 37.1 षटकांत 169 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 265 धावा केल्या होत्या.
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघामध्ये 1983 पासून द्विपक्षीय एकदिवसीय मालिका होत आहेत. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये 21 एकदिवसीय मालिका झाल्या आहेत.
भारतीय संघाला एकदाही वेस्ट विंडिजला क्लीन स्वीप देता आला नव्हता.
या उटल वेस्ट इंडिजने मात्र तीन वेळा भारताचा क्लीन स्वीप केला होता.
आता रोहित शर्मा आणि कंपनीने अखेरची लढत जिंकून इतिहास घडवला आहे.
भारताने पहिल्यांदाच वेस्ट विंडिज संघाला क्लीन स्वीप दिला आहे.