World Cup : विश्वचषकातील 5 विक्रम मोडणं कठीण, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करम्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत 673 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडणं कठीण आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन आहे, त्याने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये 659 धावा केल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन तेंडुलकर याने 1992 ते 2011 या कालावधीत विश्वचषकाच्या 45 सामन्यातील 44 डावात 56.96 च्या जबराट सरासरीने 2278 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये सहा शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे विश्वचषकात 2278 धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणं सध्या तरी शक्य दिसत नाही.
वनडे वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राच्या नावावर आहे. त्याने 71 विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया 2003 वर्ल्डप जिंकला, त्यामध्ये एकाही सामन्यात त्यांचा पराभव झाला नाही. ऑस्ट्रेलियाने लागोपाठ 11 सामने जिंकत विश्वचषकावर नाव कोरले होते. हा विक्रमही मोडणं कठीण आहे.
1975 मध्ये पहिला विश्वचषक पार पडला होता, त्यामध्ये सुनील गावसकरांनी केलेली संथ खेळी, आजही नकोसा विक्रम आहे. गावसकरांनी 174 चेंडूत फक्त 36 धावा केल्या होत्या. हा नकोसा विक्रम आजही कायम आहे.
वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक षटकारांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने वर्ल्डकपमध्ये 49 षटकार मारले आहेत.