चेतेश्वर पुजाराचा WTC Final आधी मोठा धमाका, सलग 3 शतक झळकावली
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
06 May 2023 04:58 PM (IST)
1
भारतीय संघाचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. पुजाराने इंग्लंडमध्ये सलग तीन शतके लगावली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून खेळला जाणार आहे. त्यापूर्वी पुजारा दमदार फॉर्मात आहे.
3
टीम इंडियातील खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असताना पुजारा मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तयारी करत आहे.
4
4 सामन्यातील 6 डावात पुजाराने 3 शतके झळकावली आहेत. चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
5
वूस्टरशायरविरुद्ध शतक झळकावण्यापूर्वी पुजाराने ग्लॉस्टरशायर आणि डरहमविरुद्धही शतके झळकावली आहेत.