Weekly Horoscope 08 to 14 May 2023 : 'या' 6 राशींना या आठवड्यात मिळणार नशिबाची साथ! वाचा साप्ताहिक राशीभविष्य
8 मे पासून नवीन आठवडा सुरू होणार आहे. हा आठवडा अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे. जाणून घ्या या आठवड्यातील भाग्यशाली राशींबद्दल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रह आणि राशींचे संक्रमण बदलणार आहे. येणारा आठवडा अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या राशींना या आठवड्यात प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील.
वृषभ रास : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या सर्व कामांमध्ये यशस्वी व्हाल. यासोबतच तुम्ही काही नवीन कामही सुरू करू शकता. हा आठवडा पूर्णपणे तुमच्या अनुकूल असणार आहे. मागील आठवड्यात अपूर्ण राहिलेली कामे या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन देखील करू शकता.
मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात अनेक कामात यश मिळू शकते. जरी या आठवड्यात शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत. या आठवड्यात तुम्ही अनेक नवीन लोकांना भेटू शकता. परदेशात जाण्याची इच्छाही या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. तुमची रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील.
कन्या रास : कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाच्या दृष्टीने येणारे दिवस खूप चांगले जाणार आहेत. याशिवाय तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक नवीन संधीही मिळतील. मुलांकडूनही सहकार्य मिळू शकेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर रास : मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली राहील. या आठवड्यात तुम्हाला मित्रांचे सहकार्य मिळेल. कामातही यश मिळेल. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तुमची स्थिती सुधारू शकते.आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा सुधारेल. विरोधकांवरही विजय मिळवू शकाल.
वृश्चिक रास : या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना केवळ लाभ मिळणार आहेत. तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल आणि तुम्हाला कायदेशीर बाबींमध्येही यश मिळेल. अचानक एखाद्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे जो तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे.
मीन रास : या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुमच्या घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आकस्मिक पैसा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या सर्व योजना वेळेवर पूर्ण करू शकाल.