Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल दोन वेळा खेळली, निकाल लागलाच नाही, जेव्हा भारतालाच करावा लागलेला त्याग...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम फेरीचा सामना 9 मार्चला दुबईत होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतानं नेहमीच चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार कामगिरी केलेली आहे. 2002 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीचा सामना झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
श्रीलंकेती कोलंबोमध्ये तो सामना दोन दिवस चालला होता. मात्र, पावसामुळं दोन दिवसा सामना होऊ शकला नव्हता. अखेर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आलं होतं.

कोलंबोत तो सामना 29 सप्टेंबर, 30 सप्टेंबर 2002 ला खेळवण्यात आला होता. 29 सप्टेंबरला पहिल्या दिवशी श्रीलंकेनं 5 विकेटवर 244 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतान बिनबाद 14 धावा केल्या होत्या. वीरेंद्र सेहवागनं 13 धावा तर दिनेश मोंगियानं 1 रन केली होती.
दुसऱ्या दिवशी मॅच नव्यानं सुरु झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. श्रीलंकेला 222 धावा करता आल्या.यामध्ये महेला जयवर्धनेच्या 77 धावांचा समावेश होता.
भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार असं वाटत असताना त्या दिवशी देखील जोरदार पाऊस झाला. भारताचा डाव सुरु झाल्यानंतर दिनेश मोंगिया शून्यावर बाद झाला. यानंतर सचिन तेंडुलकर अन् वीरेंद्र सेहवागनं चांगली फलंदाजी सुरु केली. मात्र, नवव्या ओव्हरमध्ये पाऊस सुरु झाला अन् डाव थांबला. अखेर दोन्ही संघांना विजयी घोषित करण्यात आलं.