Champions Trophy 2025 Final Ind vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पुन्हा खेळपट्टी बदलणार; भारत अन् पाकिस्तानची खेळपट्टी...

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. जवळजवळ 8 वर्षांनी खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड हे दोघेही हे विजेतेपद जिंकण्याचे मोठे दावेदार आहेत. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्याच्या दिवशी दुबई स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
याचदरम्यान, अंतिम सामन्याच्या मैदानाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यासाठी खेळपट्टी पुन्हा बदलण्यात येणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना ज्या खेळपट्टीवर खेळला जाईल तीच खेळपट्टी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी वापरली गेली होती.
सदर खेळपट्टी खूपच संथ होती आणि अंतिम सामन्यात पुन्हा एकदा संथ खेळपट्टी दिसण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही चांगली कामगिरी केली आणि टीम इंडियाने तो सामना 6 विकेट्सने जिंकला.
विराट कोहलीचे शतक आणि श्रेयस अय्यरच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने पाकिस्तानला हरवले. या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत 241 धावा केल्या. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 42.3 षटकांत 244 धावा करून सामना जिंकला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी केली. या सामन्यात विराटने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली होती. तर श्रेयस अय्यरने 56 धावा आणि शुभमन गिलने 46 धावा केल्या.