Champions Trophy 2025 Abrar Ahmed On Shubhman Gill: शुभमन गिलला जा जा जा म्हटले, पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेही झापले, आता अबरार अहमद म्हणाला...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. दुपारी 2.30 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमदने शुभमन गिलला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माझा कोणालाही दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं अबरार अहमद म्हणाला.
माझ्या या कृतीने कोणी दुखावले गेले असेल तर मी क्षमा मागतो, असं अबरार अहदमने सांगितले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने शुभमन गिलला आऊट केले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला होता.
अबरार अहमदच्या या कृतीनंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वासीम अक्रमने देखील अबरार अहमदला चांगलेच सुनावले होते. तुमचा संघ सामना पराभूत होत असताना तुम्ही असे सेलिब्रेशन केले तर ते टीव्हीवरही चांगले दिसत नाही. तुम्हाला नम्र असण्याची गरज आहे, असं वसी अक्रम म्हणाला होता.