IND VS AUS Test : क्रिकेट प्रेमींची झोप मोडणार... भारत-ऑस्ट्रेलियाचे सामने किती वाजता रंगणार? जाणून घ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबद्दल A टू Z
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेत एकूण 5 कसोटी खेळल्या जाणार आहेत, ज्यांची वेळ प्रत्येक सामन्याची वेळी वेगवेगळी आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियातील अनेक शहरे वेगवेगळे टाइम झोन फॉलो करतात, त्यामुळे भारतीय चाहत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट प्रेमींची झोप मोडणार आहे. कारण पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचे तीन कसोटी सामने पहाटे सुरू होतील.
भारतीय वेळेनुसार बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांची वेळ. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी – सकाळी 7:50 वाजता (पर्थमध्ये 22 ते 26 नोव्हेंबर) तर दुसरी कसोटी – सकाळी 9:30 (ॲडलेड 06 ते 10 डिसेंबर) वाजता सुरू होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांची वेळ. तिसरा सामना, सकाळी 5:50 वाजता (ब्रिस्बेन 14 ते 18 डिसेंबर) तर चौथी कसोटी – सकाळी 5 वाजता (मेलबर्न 26 ते 30 डिसेंबर) आणि शेवटची आणि पाचवी कसोटी – सकाळी 5 वाजता (सिडनी 03 ते 07 जानेवारी) सुरू होईल
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.