In Pics : केएल राहुल-अथिया शेट्टी हातात हात घालून डिनर डेटवर, फोटो झाले व्हायरल

स्टार क्रिकेटर केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खंडाळ्यात एका फार्महाऊसवर 23 जानेवारी रोजी जवळच्या निवडक लोकांच्या उपस्थितीत दोघाचं लग्न पार पडलं.

ज्यानंतर सोमवारी हे जोडपं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र बाहेर फिरताना दिसलं. (P.C. Bollywood Buzz)
केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता, त्यांनी तिथे असणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी काही पोजही दिल्या.(P.C. Bollywood Buzz)
आधी लग्नाचे मग हळदी आणि संगीत कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाल्यावर आज केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे डिनर डेचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते यावर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (P.C. Bollywood Buzz)
दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचा भाग असेल, असे मानले जात आहे की, केएल राहुल आणि अथिया शेट्टी मुंबईहून नागपूरला एकत्र येतील.(P.C. Bollywood Buzz)
केएल राहुल आणि अथियाचं लग्न अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी याच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. (P.C. Bollywood Buzz)
विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर काही दिवसांनी हळदी समारंभाचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर संगीत सोहळ्यातील फोटोही समोर आले.
ज्यात दोघेही डान्स करताना दिसत होत. या फोटोंना अवघ्या काही वेळातच अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होताना दिसला. विशेष म्हणजे, केएल राहुलचे सासरेबुवा अर्थात अथियाचे वडील सुनील शेट्टी याने देखील लव्ह इमोजी पोस्ट केला होता.
आता दोघांच्या लग्नानंतर एक ग्रँड रिसेप्शन लवकरच पार पडणार आहे.