सईद अन्वरकडून शिखर धवनला शुभेच्छा, पाकचा स्फोटक माजी सलामीवीर आता दिसतो कसा?
भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन याने शनिवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाची आठवण करून देत कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, माजी प्रशिक्षक रवि शास्त्री आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी धवनला शुभेच्छा देत, तुझी कमतरता कायम जाणवेल, असे म्हटले. (Photo Credit-Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2013 ते 2019 पर्यंत धवन, रोहित आणि कोहली यांनी भारताच्या आघाडीच्या फळीला जबरदस्त मजबूत केले होते. तिघांनी मिळून भारताला अनेक शानदार विजय मिळवून दिले. रोहित आणि धवन यांची सलामी जोडी एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगलीच गाजली.(Photo Credit-Social Media)
शिखर धवनच्या निवृत्तीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सईद अन्वरने देखील ट्विट करत शिखर धवनला शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Credit-Social Media)
तुझी मेहनत, जिद्द, दर्जेदार क्रिकेट कौशल्य आणि महान माणूस म्हणून कायम स्मरणात राहील...पुढच्या कारकिर्दीसाठी तुला शुभेच्छा, असं सईद अन्वर म्हणाला. (Photo Credit-Social Media)
1990 च्या दशकात पाकिस्तान क्रिकेट संघात मोठे खेळाडू होते. वसीम अक्रम, वकार युनूस, सकलेन मुश्ताक, इंझमाम उल हक आणि सईद अन्वर अशी मोठी नावे होती. (Photo Credit-Social Media)
1989 मध्ये डावखुरा स्टायलिश फलंदाज सईद अन्वर पदार्पण केले. त्यानंतर जवळपास 15 वर्षे सईद अन्वर एकदिवसीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत राहिला. (Photo Credit-Social Media)
विशेषतः सईद अन्वरची बॅट भारताविरुद्ध खूप प्रभावी ठरली. सईद अन्वरने भारताविरुद्धच्या केवळ 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 हजारांहून अधिक धावा केल्या. ज्यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे. तसेच सईद अन्वरने 8 वेळा पन्नास धावांचा टप्पा पार केला.(Photo Credit-Social Media)
सईद अन्वर 20 शतकांसह पाकिस्तानचा सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज ठरला आहे. त्याने 247 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8,824 धावा आणि 91 कसोटी डावांमध्ये 11 शतकांसह 4,052 धावा केल्या. (Photo Credit-Social Media)
सईद अन्वर हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग तीन शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहे. 1993 मध्ये शारजाह येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध शतके झळकावून त्याने ही कामगिरी केली होती. (Photo Credit-Social Media)
भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने केलेल्या 194 धावा ही 12 वर्षांतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.(Photo Credit-Social Media)
1996-97 मध्ये भारताविरुद्ध चेन्नई वनडेमध्ये 194 धावांची तुफानी इनिंग खेळणाऱ्या सईद अन्वरचे द्विशतक 6 धावांनी हुकले. हा विक्रम 13 वर्षे अबाधित राहिला होता.(Photo Credit-Social Media)