Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही, बीसीसीआय आयसीसीला अधिकृतपणे कळवणार, पीसीबीची कोंडी होणार?
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआयनं भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याची भूमिका मांडलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तान क्रिकेट बोर्डानं गेल्या आठवड्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांच्या वेळापत्रकाचा आराखडा मांडला होता. त्यानुसार भारतीय संघाचे सामने लाहोरमध्ये होणार होते. मात्र, बीसीसीआयनं वेगळी भूमिका घेतली आहे.
बीसीसीआयनं आशिया कप प्रमाणं यावेळी देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान ऐवजी त्रयस्थ ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित करावेत अशी भूमिका घेतलीय.
चॅम्पियन्स ट्रॉफीत आठ संघ सहभागी होणार असून दोन गटात त्यांची विभागणी करण्यात येणार आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे एका गटात आहेत. भारताचे सामने सुरक्षेच्या कारणामुळं लाहोरमध्ये घेण्याचा पीसीबीचा प्रस्ताव आहे.
बीसीसीआयनं मात्र पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. बीसीसीआय याबाबतचा अधिकृत निर्णय आयसीसीला कळवणार असल्याची माहिती आहे.
आयसीसीच्या कोलंबोमध्ये होणाऱ्या बैठकीवेळी बीसीसीआय त्यांचा निर्णय अधिकृतपणे कळवणार असल्याची माहिती आहे. स्पोर्ट्स स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय त्यांची भूमिका आयसीसीला कळवेल. आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करताना पीसीबीला यावेळी देखील बॅकफूटवर जावं लागणार असल्याचं चिन्ह आहे.