Share Market : विदेशी गुंतवणूकदांनी जानेवारीत पैसे काढले, सेन्सेक्स कोसळला, हा ट्रेंड कधी सुरु झाला, 4 वर्षांचे धक्कादयक आकडे समोर
भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडील समभागांची विक्री करुन जानेवारी महिन्यात आतापर्यंत 22194 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजानेवारी महिना सुरु होताच विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून त्यांचे समभाग विकून पैसे काढून घेतले आहेत. कारभाराच्या पहिल्या सात दिवसांमध्ये विक्रीचं सत्र सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 22 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
विदेशी गुंतवणूकदारंकडून जानेवारी महिन्यात पैसे काढून घेण्याचा ट्रेंड 2022 पासून सुरु झाला आहे. त्यावर्षी जानेवारी महिन्यात 33303 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारंनी काढून घेतले होते.
2023 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी तोच ट्रेंड कायम ठेवला. त्यावर्षी जानेवारी महिन्यात 28852 कोटी रुपये भारतीय बाजारातून काढण्यात आले. तर, 2024 मध्ये शेअर बाजारातून 25744 कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. आता पहिल्या सात दिवसांमध्येच 22 हजार कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत.
डॉलर मजबूत झाल्यानं विदेशी गुंतवणूकादारांनी त्यांची गुंतवणूक काढून घेतलीय. कारण, भारतीय रुपया कमजोर होत आहे. सध्या भारतीय रुपया निचांकी पातळीवर पोहोचला आहे. सध्या रुपया एका डॉलरच्या तुलनेत 86.31 रुपयांवर आहे. देशाचं विदेशी चलनाचं भांडार देखील कमी होत आहे. वाढती महागाई, डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार येताच लावलं जाणारं टॅरिफ, जीडीपीचा मंदावलेला वेग ही देखील कारणं आहे. डॉलर इंडेक्समध्ये तेजी असून ती सध्या 109 वर आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)