BCCI : कुबेराचा खजाना! बीसीसीआयची 5 वर्षात 27,000 कोटींची कमाई, 'हा' पैसा नेमका येतो कुठून?
भारतीय क्रिकेट बोर्डाने गेल्या पाच वर्षांमध्ये 27000 कोटीहून अधिक कमाई केली आहे. बंपर कमाईसोबतच बीसीसीआयने टॅक्सही मोठ्या प्रमाणात भरला आहे. (PC:Google)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्थिक वर्ष 2018 ते 2022 दरम्यान बीसीसीआयने 27,411 कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या संदर्भात माहिती दिली आहे. (PC:Google)
भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयनं गेल्या पाच वर्षात बंपर कमाई केली आहे. पण बीसीसीआयच्या उत्पन्नाचं नेमकं साधन काय, या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. (PC:Google)
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या उत्पन्नासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी बीसीसीआयच्या उत्पन्न आणि त्यांचं साधनही सांगितलं. (PC:Google)
पंकज चौधरी यांनी सांगितलं की, बीसीसीआयला हे उत्पन्न मीडिया हक्क (Media Rights), प्रायोजक (Sponsership) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महसूल शेअर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. (PC:Google)
बीसीसीआयनेही या पाच वर्षांत चांगला कर भरला असून त्याचा आकडा 4298 कोटी रुपये आहे. (PC:Google)
बीसीसीआयने या पाच वर्षांत 15,170 कोटी रुपये खर्च दाखवला आहे. बीसीसीआयने आर्थिक वर्ष 2018 मध्ये 2917 कोटी रुपयांचा महसूल दाखवला होता, जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये 7606 कोटी रुपयांवर गेला. (PC:Google)
आयपीएल आणि भारतीय क्रिकेटच्या मीडिया हक्कांच्या किमतीत वाढ हे त्यामागचे मुख्य कारण आहे. (PC:Google)