BCCI Central contract : भारतीय संघातील 6 खेळाडूंचा बीसीसीआय केंद्रीय करारातून पत्ता कट
एवढेच नाही तर या दोन खेळाडूंशिवाय आणखी 5 खेळाडू आहेत ज्यांना बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकले आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीसीसीआयने 40 खेळाडूंची चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. सर्व खेळाडू A+, A, B आणि C श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. मात्र, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारात स्थान मिळालेले नाही. दोन्ही खेळाडू बराच वेळ बोर्डाच्या टार्गेटवर होते. (Photo Credit : PTI)
बीसीसीआयने 40 खेळाडूंची चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. सर्व खेळाडू A+, A, B आणि C श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. मात्र, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारात स्थान मिळालेले नाही. दोन्ही खेळाडू बराच वेळ बोर्डाच्या टार्गेटवर होते.(Photo Credit : PTI)
मात्र, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत नाव कमावणारे युवा ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनाही केंद्रीय करारात स्थान मिळाले नाही. (Photo Credit : PTI)
चेतेश्वर पुजारा भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा बीसीसीआयच्या नव्या केंद्रीय करारापासून वंचित राहिला. यावेळी त्याचा कोणत्याही श्रेणीत समावेश नाही. पुजाराने भारतासाठी 103 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत.(Photo Credit : PTI)
दीपक हुडा भारतासाठी 21 टी-२० सामने खेळलेला दीपक हुडा 2021 ते 2022 या काळात टीम इंडियामध्ये एक मोठे नाव होते. तो सतत भारतीय T20 संघाचा भाग होता. पण दीपकची खराब कामगिरी लक्षात घेऊन त्याला वगळण्यात आले. यावेळी तो केंद्रीय कराराचा भागही नाही.(Photo Credit : PTI)
शिखर धवन भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनलाही यावेळी बीसीसीआयच्या केंद्रीय करारात स्थान मिळाले नाही. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियापासून दूर आहे. त्याने भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत.(Photo Credit : PTI)
युजवेंद्र चहल स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून काढून टाकण्यात आले आहे. 2023-24 च्या नवीन करारातही त्याला स्थान मिळाले नाही. चहलही बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे.(Photo Credit : PTI)
उमेश यादव टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळलेला उमेश यादव देखील बीसीसीआयच्या नवीन केंद्रीय कराराचा भाग नाही. बराच काळ यादव भारताकडून फक्त कसोटी क्रिकेट खेळत होता. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी 57 कसोटी, 75 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत.(Photo Credit : PTI)
अजिंक्य रहाणे गेल्या अनेक दिवसांपासून अजिंक्य रहाणे आपल्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या रणजी ट्रॉफीतही अजिंक्य फारशी चांगली खेळू करू शकला नसून त्याची बॅट शांतच पाहायला मिळाली. दोन सामन्यांतील तीन डावांत रहाणेनं फक्त 16 धावा काढल्या.(Photo Credit : PTI)
त्याला दोन वेळा खातंही उघडता आलं नाही. अशा परिस्थितीमध्ये अजिंक्य राहणेला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय. अजिंक्य रहाणेनं जुलै 2023 मध्ये त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तेव्हापासून आजपर्यंत रहाणे आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून लांबच राहिला. (Photo Credit : PTI)