BCCI announces India Women Squad : टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! BCCIची मोठी घोषणा, 'या' खेळाडूंच्या खांद्यावर संघाची धुरा
आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीत साधू, सायमा ठाकोर, सायली सातघरे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, भारतीय महिला क्रिकेट येत्या 10 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय महिला संघाचीही घोषणा केली आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला या मालिकेत संघात संधी मिळालेली नाही.
या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय संघातील आणखी एका वरिष्ठ खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे.
ही खेळाडू दुसरी कोणी नसून रेणुका सिंग आहे. रेणुका सिंगने मागच्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती, मात्र कामाच्या बोज्यामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे.
हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद स्मृती मंधानाकडे देण्यात आले आहे. मंधाना टीम इंडियाची उपकर्णधार आहे, त्यामुळे तिच्याकडे हरमनप्रीतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेत दीप्ती शर्मा टीम इंडियाची उपकर्णधार असेल.
राघवी बिश्त आणि सायली सातघरे यांचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.