HMPV Virus in India : HMPV ची भारतात एन्ट्री; दोघांना लागण
HMPV आरएनए व्हायरस आहे. भारतात HMPV चे दोन रुग्ण बंगळुरूमध्ये आढळून आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआठ महिन्यांच्या चिमुरडीला या व्हायरसची लागण झाली आहे. बाळामध्ये व्हायरसची लक्षणं आढळून आल्यानं तिचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले.
चिमुकलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. तसेच, आणखी एकाला या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
जेव्हा व्हायरसचा संसर्ग होतो, तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि COVID-19 सारखी लक्षणं दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो. यापैकी 2 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो.
चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, त्याच्या लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणं आणि घशात खवखव होणं यांसारखी लक्षणं आढळतात.
HMPV व्यतिरिक्त, Influenza A, Mycoplasma Pneumoniae आणि COVID - 19 ची प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत.
HMPV व्हायरस पहिल्यांदा 2001 मध्ये आढळून आला.
यापूर्वी अमेरिका, कॅनडासारख्या देशांमध्ये यापूर्वी या व्हायरसची साथ पसरली होती.
एका डच संशोधकानं श्वसनाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये हा व्हायरस शोधला होता.
आता जगात या व्हायरसनं धाकधूक वाढवली आहे.