Axar Patel : हम है सीधे साधे 'अक्षर अक्षर' , आधी बॅटिंगमध्ये चमक दाखवली, मग गोलंदाजीत कमाल, अक्षर पटेलचा जलवा
भारताची फलंदाजी सुरु असताना अखेरच्या ओव्हरमध्ये ख्रिस जॉर्डनच्या बॉलिंगवर अक्षर पटेलनं खणखणीत षटकार खेचला. अक्षरनं पटेलनं यापूर्वी देखील दमदार फलंदाजी केली होती. अक्षरनं इंग्लंड विरुद्ध 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या. भारताला 170 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्या धावा महत्त्वाच्या ठरल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत इंग्लंडनं आक्रमक फलंदाजी सुरु केली होती. जोस बटलर आक्रमक फलंदाजी करत होता. रोहित शर्मानं जसप्रीत बुमराह ऐवजी अक्षर पटेलला गोलंदाजी दिली. अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर बटलरची विकेट घेत रोहितला जे हवं होतं ते मिळवून दिलं.
भारताला जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांच्या जोडीनं 2022 च्या सेमी फायनलमध्ये दमदर फलंदाजी केली होती. इंग्लंडनं भारताला 10 विकेटनं हरवलं होतं. मात्र, अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर बटलरला घरचा रस्ता दाखवून दिला.
अक्षर पटेलनं फलंदाजी करताना 10 धावा केल्या. तर चार ओव्हरमध्ये 23 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, लियोम लिव्हिंगस्टोनला धावबाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अक्षर पटेल ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये गेमचेंजर खेळाडू ठरलाय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये कॅप्टन मिशेल मार्शचा टिपलेला जादूई कॅच आणि इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरची घेतलेली विकेट, यामुळं भारताच्या विजयाचा पाया रोवला गेला. अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीचा जलवा सुरु असून भारताला देखील त्याचा फायदा होतोय.